एक लिंबू २३ हजार रुपयांचा !

महत्वाच्या आणि किंमती वस्तूची निलामी होते हे तुम्ही ऐकलं असेल. मात्र एका लिंबाची निलामी झाली आहे. ऐकून थोडसं आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे, तामिळनाडूच्या विल्लुपूरम येथे ही घटना घडली.

Updated: Apr 6, 2015, 05:17 PM IST
एक लिंबू २३ हजार रुपयांचा ! title=

विल्लुपूरम : महत्वाच्या आणि किंमती वस्तूची निलामी होते हे तुम्ही ऐकलं असेल. मात्र एका लिंबाची निलामी झाली आहे. ऐकून थोडसं आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे, तामिळनाडूच्या विल्लुपूरम येथे ही घटना घडली.

तामिळनाडूच्या विल्लुपूरम येथे चक्क एका लिंबाची निलामी झाली आहे. तेथील इडुम्बन मंदिरात अकरा दिवस चालणाऱ्या धार्मिक उत्सव उथीरामच्या पहिल्याच दिवशी एक लिंबू २३ हजारांना विकला गेला आहे.

या व्यतिरिक्त आणखी दहा लिंबू भाविकांनी ६१ हजार रुपयांना विकत घेतले. विल्लुपूरमच्या मंदिरात फळे अर्पण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्वास आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.