'इच्छाधारी युवकाचे' नागिनीसोबत लग्न पाहण्यासाठी जमली गर्दी

एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक जगातसुद्धा अंधश्रद्धेचं नाणं खणखणीत वाजतांना दिसत आहे. त्याची प्रचिती आली वाराणसीत.

Updated: Apr 6, 2015, 03:26 PM IST
'इच्छाधारी युवकाचे'  नागिनीसोबत लग्न पाहण्यासाठी जमली गर्दी title=

वाराणसी : एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक जगातसुद्धा अंधश्रद्धेचं नाणं खणखणीत वाजतांना दिसत आहे. त्याची प्रचिती आली वाराणसीत.

कारण वाराणसीमध्ये स्वत:ला इच्छाधारी नाग म्हणत नागिणीसोबत विवाह करणाऱ्या तरुणाला पाहयला अक्षरश: माणसांची गर्दी जमा झाली होती. त्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचरण करावं लागलं. 

बनारसच्या राजपूर गावातील ही घटना आहे. त्या गावात राहणारा स्वत:ला इच्छाधारी नाग सांगणारा संदीप पटेल नागिनीसोबत लग्न करणार असल्याची बातमी सर्व जिल्ह्यात पसरली होती. ते लग्न पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तेथे माणसांची गर्दी जमा झाली होती. त्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांच्या पाच टीम घटनास्थळी आल्या होत्या. संदीपच्या या कृतीबद्दल पोलिसांनी संदीप आणि त्याच्या वडिलांना अटक केले आहे. 

संदीपबाबत सांगायचं तर तो अर्धांगवायूने बाधीत असल्याने त्याचे हात पाय काम करत नाहीत. त्यामुळे तो जमिनीवर रेंगाळत चालतो. त्यामुळे त्याला गावातील लोक इच्छाधारी नाग बोलू लागले. मग काय, संदीपने चक्क नागिनीसोबत लग्न करणार असल्याची अफवा उठवून दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.