९० वर्षाच्या म्हाताऱ्याला पुन्हा करायचेय लग्न

उतारवयात माणसांना इतर कोणत्याही गरजांपेक्षा अधिक महत्त्वाची असते ती सोबतीची गरज. अनेकदा काही कारणांमुळे ज्येष्ठांना एकाकी आयुष्य जगाव लागत. 

Updated: Jan 11, 2016, 04:21 PM IST
९० वर्षाच्या म्हाताऱ्याला पुन्हा करायचेय लग्न title=

अहमदाबाद : उतारवयात माणसांना इतर कोणत्याही गरजांपेक्षा अधिक महत्त्वाची असते ती सोबतीची गरज. अनेकदा काही कारणांमुळे ज्येष्ठांना एकाकी आयुष्य जगाव लागत. यावेळेस पैसा-संपत्तीपेक्षा त्यांना सोबत महत्त्वाची असते. अशाच एकाकीपणाला कंटाळलेले ९० वर्षाचे गुजरातचे मनसुख लाल (नाव बदललेले) यांना पुन्हा लग्न करायचेय.

बँकनिवृत्त असलेल्या मनसुखलाल यांच्या पत्नीचे ३० वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहे. सध्या ते एका मुलीकडे राहतात. त्यासाठी ते दरमहिन्याला तब्बल १७ हजार रुपये भाडंही देतात. तर जेवणासाठी त्यांना मुलाला दरमहिन्याला सहा हजार रुपये देतात. 

माझ्या मुलांना माझ्यापेक्षा जास्त माझ्याकडे असलेल्या पैशांमध्ये अधिक रस आहे. मला एकाकीपणाचा कंटाळा आलाय यासाठीच मला दुसरे लग्न करायचेय. जेणेकरुन अखेरचे दिवस तिच्यासोबत घालवू शकेन, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी एका विवाहसंस्थेत नावही नोंदवलेय.