भारतीयांना सेक्सपेक्षा स्मार्टफोन अधिक महत्त्वाचा

भारतातील स्मार्टफोन धारकांपैकी सुमारे ७४ टक्के जण आपल्या जोडीदाराशी सेक्स करण्यापेक्षा अधिक स्मार्टफोन आवडत असल्याचे विचित्र आणि धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेमध्ये समोर आला आहे. 

Updated: Jul 30, 2015, 07:48 PM IST
भारतीयांना सेक्सपेक्षा स्मार्टफोन अधिक महत्त्वाचा  title=

मुंबई : भारतातील स्मार्टफोन धारकांपैकी सुमारे ७४ टक्के जण आपल्या जोडीदाराशी सेक्स करण्यापेक्षा अधिक स्मार्टफोन आवडत असल्याचे विचित्र आणि धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेमध्ये समोर आला आहे. 

आज काल आपण आपल्या कुटुंबापेक्षा सर्वाधिक काळ आपल्या स्मार्टफोन सोबत घालवतो. स्मार्टफोन आपला एखादा अंग असल्यासारखे लोक वागत आहेत. त्यामुळे एका सर्वे कंपनीने स्मार्टफोनचे तुमच्या आय़ुष्यातील स्थान याबाबत एक सर्वे घेतला, त्यात अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. स्मार्टफोनमुळे दोन व्यक्तींतील संवाद कमी झाला आहे. तसेच लाइफ पार्टनरशी जवळीकता कमी होत चालली आहे. 

स्मार्टफोनचा नाद लागण्यामध्ये भारतासोबत चिनी नागरीकही आघाडीवर आहेत. 

एका वेबसाइटने सात देशातील सात हजार स्मार्टफोन यूजुर्सशी मते जाणून घेतली. यातील ६० टक्के लोकांनी फोन हातात असतानाच रात्री झोप कधी लागते समजत नाही. भारतीयांबाबत हे प्रमाण ७४ टक्के आहे तर चीनमध्ये हे प्रमाण ७० टक्के आहे. 

या वरील व्यक्तींनी स्मार्टफोनला आपला पार्टनर बनवला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विकेंडला पार्टनरसोबत सेक्स करण्यापेक्षा ही मंडळी स्मार्टफोनला चिकटलेली असतात. फोन असला की काहीच सूचत नाही, झोपतानाही फोन सोबत लागत असल्याचे अनेकांना सांगितले. 

सहा व्यक्तींपेकी एक अंघोळ करतानाही स्मार्टफोन वापरत असल्याचे समोर आले आहे. ५४ टक्के लोक पाळीव प्राण्यांपेक्षा स्मार्टफोनला अधिक जपतात. ४० व्यक्तींनना मित्रांपेक्षा स्मार्टफोन जवळचा वाटत आहे. ३९ टक्के लोक म्हणतात की स्मार्टफोनने आनंद मिळतो तर ७९ टक्के लोक म्हणतात की यामुळे आम्ही बरेच काही गमवतो आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.