स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचा सुराज्याचा नारा

देशभरात 70 वा स्वातंत्र्य दिनाचा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं.

Updated: Aug 15, 2016, 12:28 PM IST
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचा सुराज्याचा नारा title=

नवी दिल्ली :देशाच्या 70व्या स्वातंत्र्यदिनाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं. यावेळी देशाला संबोधित करताना सामाजिक एकतेचा नारा दिलाय.  

देश सशक्त करायचा समाज सशक्त करण्याशिवाय पर्याय नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलयं. देशात गोरक्षेचा मुद्दा जोरदार गाजत असताना लालकिल्ल्यावरून मोदींनी सामाजिक समरसेतची हाक दिली. 

लालकिल्ल्यावरून याआधीच्या सरकारांनी केलेल्या कामाचा पाढा वाचलाय...मी आमच्या सरकारची कार्यसंस्कृती सांगणार आहे असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. पण भाषणादरम्यान मोदींनी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांचाच पाढा वाचला. 

सामान्य मासणाच्या जीवनात सरकारनं बदल केल्याचा दावा यावेळी पंतप्रधांनी केला. भीषण दुष्काळामुळे डाळी महाग झाल्या. पण गेल्या सरकारच्या तुलनेत महागाई नियंत्रणात ठेवण्यात आल्याचं मोदींनी म्हटलंय. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

१. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात

२. सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

३. देशातील शेतकऱ्यांच विशेष अभिनंदन, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार - मोदी

.४. देशातील ७० कोटी नागरिकांना आधारशी जोडले

५.तंत्रज्ञानामुळे एका मिनिटांत १५०० तिकीटे बुक करता येतात - मोदी

 ६. केवळ जनतेला घोषणा देऊन काही साध्य होत नाही. 

७. मध्यमवर्गीय जनतेला पासपोर्ट मिळवणे सोपे झालेय. एक ते दोन आठवड्यांत आता पासपोर्ट मिळणे शक्य. 

८.साडेतीनशे रुपयांचा एलईडी बल्ब ५० रुपयांना मिळतोय. 

९. २ वर्षांच्या काळात अनेक कामे झाली. 

१०. २१ कोटी लोकांना जनधन योजनेशी जोडले - मोदी

११. देशाची ओळख बनवणे महत्त्वाचे - पंतप्रधान मोदी 

१२. १० हजार गावांत विजेचा प्रकाश पोहोचला - मोदी

१३. लोकशाहीत अहंकाराला स्थान नाही

१४. प्रलंबित विकासकामांना गती मिळवून दिली. 

१५. स्पेक्ट्रम लिलाव ऑनलाईन केला

१६. जनतेला २ आठवड्यात पासपोर्ट मिळतायत

१७. ७० कोटी जनतेला आधारचा फायदा