मुंबई : २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेने सगळ्याच विरोधी पक्षांना अक्षरचा पछाडत देशात बहुमताचं सरकार आणलं. मोदींची ही लाट आता उरलेली नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढचे ५ वर्ष पंतप्रधान राहावेत असं जवळपास ७० टक्के लोकांना आजही वाटतंय. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये ही माहिती समोर आली आहे.
मीडिया स्टडी सेंटरकडून करण्यात आलेल्या या सर्वेमध्ये २०२४ पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहावेत असं वाटतंय तर ६२ टक्के लोकं मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत.
५० टक्के लोकांना असंही वाटतंय की मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही देशाच्या स्थितीत कोणताच बदल झालेला नाही. तर १५ टक्के लोकांना वाटतंय की मागील २ वर्षात देशाची स्थिती सुधरली आहे. ४३ टक्के लोकांना असं वाटतंय की सरकारच्या योजना या गरिबांपर्यंत पोहोचतच नाही.
१५ राज्यांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील जवळपास ४ हजार लोकांचं मत नोंदवण्यात आलं आहे. जेव्हा मोदींच्या मंत्र्यांच्या कामगिरीबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा सुषमा स्वराज, राजनाथ सिंग, सुरेश प्रभू, मनोहर परिकर आणि अरुण जेठली यांच्या कामाचं अनेकांना कौतूक केलं आहे. तर रामविलास पासवान, बंडारु दत्तात्रय, जे पी नड्डा, प्रकाश जावडेकर आणि राधा मोहन सिंग यांच्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी दर्शवली आहे.
स्मृती इरानी यांची कामगिरी समाधानकारक असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. रेल्वे, वित्त आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या कामिगिरीवर लोकं खूश असल्याचं सर्वमधून समोर आलं आहे.