भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास जेलची हवा, एक कोटीचा दंड

भारताच्या नकाशाचे चुकीचे वर्णन केले किंवा तसा तो दाखविल्यास जेलची हवा खावी लागले. त्याचबरोबर एक कोटीचा दंडही आकारला जाईल.

Updated: May 6, 2016, 09:49 AM IST
भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास जेलची हवा, एक कोटीचा दंड  title=

नवी दिल्ली : भारताच्या नकाशाचे चुकीचे वर्णन केले किंवा तसा तो दाखविल्यास जेलची हवा खावी लागले. त्याचबरोबर एक कोटीचा दंडही आकारला जाईल.

नवा प्रस्तावित कायदा

अनेकवेळी भारताचा भाग पाकिस्तान, चीन आदी देशांचा असल्याचे दाखविण्यात आलेय. तर पाकव्याप्त काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश हा देशाचा भाग नसल्याचं दाखवले गेले आहे. त्यामुळे यापुढे जर अशी मुद्दाम चूक केली तर दंडाच्या कारवाईसह तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. भारताच्या नकाशाचं चुकीचे वर्णन करणाऱ्यांना ७ वर्षांच्या तुरुंगवास होणार असून एक कोटी रुपयांचा दंड ठोठवला जाईल, असे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या प्रस्तावित कायद्यामध्ये म्हटलेय.

परवानगी नसेल तर

केंद्र सरकार लवकरच भौगोलिक माहिती नियमन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यापुढे तुमच्याकडे परवानगी नसेल तर आकाशातून भारताचा नकाशा काढता येणार नाहीत. एखादी संस्था तसेच व्यक्तीला अंतराळातून भारताचे फोटो किंवा एअरक्राफ्ट, एअरशिप, बलून तसेच यूएव्हीच्या मदतीने भारतातील जागेसंदर्भात माहिती घ्यायची असेल तर त्यांना सरकारची परवानगी आणि परवाना घेणे बंधनकारक या कायद्यानुसार असणार आहे.

देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी...

तसंच गूगलला गूगल मॅप किंवा गूगल अर्थ या सेवेसाठी परवान घेणे बंधनकारक असेल. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी भारत सरकार अशा नकाशांवर 'संवेदनशील परीक्षण'द्वारे नजर ठेवणार आहे.दरम्यान, हा कायदा भारतीय संस्थांना लागू नसेल. पण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आले तर चौकशी आणि कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

कायद्यातील अशा असणार तरतुदी?

- सुरक्षा परीक्षण प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणतीही माहिती वितरीत करता येणार नाही.
- भारतात किंवा परदेशात कोणत्याही प्रकारे भारतीय भौगोलिक माहितीचा प्रसार करणे, वितरीत करणे किंवा प्रसिद्ध करणे हा कायद्याने गुन्हा असेल.
- भारताविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार, प्रसिद्धी किंवा नकाशे, तक्ते यांचे वितरण करणे गुन्हा असेल.
- ऑनलाईन वेबसाईट, इंटरनेट इतर किंवा कोणत्याही माध्यमातून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमांसह इतर भौगोलिक रचना चुकीची प्रसिद्ध झाल्यास सात वर्ष जेल आणि एक कोटी रुपये दंड