पिकनिक स्पॉटवर जोडप्याला गाठून... मुलींवर सामूहिक बलात्कार

 मान्सूनचे दिवस आहेत... नक्कीच तुम्हीही एखादी पिकनिक प्लान करत असाल... पण, पिकनिकला चाललाय तर १० वेळा विचार करा. मौज मजेसाठी पिक निकला जात असाल तर सावध राहा. याला कारणही तसंच आहे.

Updated: Jun 25, 2015, 05:04 PM IST
पिकनिक स्पॉटवर जोडप्याला गाठून... मुलींवर सामूहिक बलात्कार title=

इंदौर :  मान्सूनचे दिवस आहेत... नक्कीच तुम्हीही एखादी पिकनिक प्लान करत असाल... पण, पिकनिकला चाललाय तर १० वेळा विचार करा. मौज मजेसाठी पिक निकला जात असाल तर सावध राहा. याला कारणही तसंच आहे.

कारण पिकनिक स्पॉटवर प्रेमी युगुलांना गाठून जवळपास ४५ मुलींना आपलं शिकार बनवणाऱ्या एका टोळीला नुकतंच इंदौर पोलिसांनी गजाआड केलंय. पिकनिक स्पॉटवर जाणाऱ्या प्रेमी युगूलांना त्रास देणं, जोडप्याला मारहाण करणं आणि मग मुलींसोबत बलात्कार करणं हेच या टोळीचे धंदे होते. 

इंदौरपासून १६ किमी दूर कजलीगड पिकनिक स्पॉटवर गेल्या दोन वर्षात अशा काही भयंकर घटना घडत आहेत ज्या ऐकून तूम्हीही चकित व्हाल. इंदौर पोलिसांच्या माहितीनुसार या स्पॉटला या टोळीनं रेपचा अड्डा बनवलं होतं. या स्पॉटवर येणाऱ्या प्रेमी युगूलांना लक्ष्य करत ही टोळी त्याची लूट करत होती आणि त्यानंतर मुलींसोबत गँगरेप केला जात होता. टोळीच्या म्होरक्यानं आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीय. त्यानं या पिकनिक स्पॉटवर ४५ मुलींसोबत गँगरेप करून त्याचा व्हिडिओ शुटींग केल्याचीही कबुली या आरोपींनी दिलीय.  

काही दिवसांपूर्वी सहा विद्यार्थ्यांना लूटल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलंय. या प्रकरणात आतापर्यंत एका अल्पवयीन मुलासह ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यानंतर फार धक्कादायक माहिती समोर आलीय. ही टोळी एकांतात बसलेली टोळी हेरून त्यांचे मोबाईल काढून घेऊन त्यातील सिमकार्ड काढून फेकून देत असे. त्यानंतर मुलाला लूटून त्याला बांधून मुलीसोबत गँगरेप केला जात असे... आणि हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैदही केला जायचा... याच व्हिडिओची भीती दाखवत जोडप्यांना आपलं तोंड बंद ठेवायची तंबीही दिली जायची. बदनामीच्या भीतीने आजपर्यंत कुणी तक्रार न केल्यामुळे त्याचा फायदा घेत या टोळीनं गेल्या दोन वर्षात या घाणेरड्या प्रकाराने ब्लॅकमेल करत बऱ्याच जणांकडून पैसेही उकळले आहेत. 

टोळीचा म्होरक्या श्रीराम कालूसिंहला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत. पोलीस आरोपींकडून रेपचे व्हिडिओही जप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत. पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनांना बळी पडलेल्या पीडितांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.