रेव पार्टीत मस्ती करणाऱ्या चार तरूणींसह ४४ जण ताब्यात

मेवात क्षेत्रात आयोजित एका रेव्ह पार्टीचा भांडफोड करत पोलिसांनी ४४ तरूणांना अटक केली. यात एक परदेशी नागरिकासह चार तरूणींचा समावेश आहे. 

Updated: Dec 26, 2014, 04:11 PM IST
रेव पार्टीत मस्ती करणाऱ्या चार तरूणींसह ४४ जण ताब्यात title=

गुडगाव : मेवात क्षेत्रात आयोजित एका रेव्ह पार्टीचा भांडफोड करत पोलिसांनी ४४ तरूणांना अटक केली. यात एक परदेशी नागरिकासह चार तरूणींचा समावेश आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून रेव्ह पार्टीसाठी अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी खास कोडवर्ड्स वापरण्यात आला होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. 

ही पार्टी मेवातच्या कोटा-बिस्सर गावातील एका फॉर्म हाऊसमध्ये चालली होती. नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या फार्म हाऊसमधून मोठ्या प्रमाणात एलएसडी, कोकीन, मेथामफेटामाईनसह गांजा आणि चरस मिळाले आहे. 

पोलिसांनी ड्रग्स मिळाल्याने सात तरूणांसह फार्म हाऊसच्या मालकाला अटक केली आहे. इतर आरोपींना प्रकरण दाखल केल्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन जामीनावर सुटका केली. 

पहाटे ४ वाजता करण्यात आलेल्या कारवाईत अनेक तरूण-तरुणी मोठ-मोठ्याने गाणे लावून ड्रग्स घेत होते आणि नाचत होते. अनेक तरूण तरूणी काळोखाचा फायदा घेत पळून गेला. पण पोलिसांनी ४४ जणांना अटक केली. त्यांची चौकशी केल्यानंतर फेसबूक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरूणांना एकत्र बोलविण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी हजार रुपये वसूल करण्यात आले होते. तसेच यावेळी त्यांना ड्रग्ससोबत दारूही देण्यात आली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.