मुंबई-पुण्यासह देशातील ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर

नेपाळमधील भूकंपानं हजारो नागरिकांचे बळी घेतलेले असतानाच भारतातील मुंबई-पुण्यासहित ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर आहे. केंद्र सरकारनं आता त्या शहरांची यादी तयार केली आहे. त्यानुसार ६० टक्के भूभागावर विनाशाची टांगती तलवार लटकत आहे. 

Updated: Apr 28, 2015, 11:44 AM IST
मुंबई-पुण्यासह देशातील ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर title=

नवी दिल्ली: नेपाळमधील भूकंपानं हजारो नागरिकांचे बळी घेतलेले असतानाच भारतातील मुंबई-पुण्यासहित ३८ शहरं भूकंपाच्या तोंडावर आहे. केंद्र सरकारनं आता त्या शहरांची यादी तयार केली आहे. त्यानुसार ६० टक्के भूभागावर विनाशाची टांगती तलवार लटकत आहे. 

पाहा या महत्त्वाच्या शहरांना भूकंपाचा धोका 

मुंबई - पुणे - अहमदाबाद - दिल्ली - कोची - थिरूवनंतपुरम - चेन्नई - कोलकाता - पाटणा - डेहराडून 

भूकंपाचा धोका असलेल्या शहरांची यादी तयार होताच नॅशनल डिजास्टर मॅनेजमेन्ट अॅथॉरिटीनं खबरदारी म्हणून काही महत्त्वाची पावलंही उचलली आहेत. यापुढं उभी राहणारी बांधकामं ही भूकंपरोधक असतील याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आर्किटेक्टस्, इंजिनीयर्स, गवंडी यांना प्रशिक्षण देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. तसंच इमारती भूकंपरोधक करण्याच्या दृष्टीनं मुंबईतील आयआयटीच्या नेतृत्वाखाली देशातील सहा आयआयटींमधील तज्ज्ञांची पथकं १० गटांमध्ये इमारतींचं वर्गीकरण करणार आहेत. भूकंपप्रवण झोन-४ आणि झोन-५मध्ये २३५ जिल्हे येतात, अशी माहिती नॅशनल डिजास्टर मॅनेजमेन्ट अॅथॉरिटीचे उपाध्यक्ष शशिधर रेड्डी यांनी आज दिली.

काय आहे भूकंपरोधी तंत्रज्ञान...

याला ‘अर्थक्वेक रेझिस्टंट टेक्नॉलॉजी’ असं म्हणतात. यात बांधकाम करताना जमिनीखालील माती आणि दगडांचे नमुने घेतले जातात. त्यावर संशोधन करून इमारतीच्या पायासाठी कोणते मटेरियल वापरायचे हे ठरवले जाते. जमिनीखाली दगडाचा पृष्ठभाग शोधून तिथपासून बांधकाम केलं जातं. गुजरातच्या भूजमधील भूकंपानंतर अहमदाबादमधील रुग्णालय याच तंत्रज्ञानानं उभारलं गेलं. मुंबईतील भाभा अणुशक्ती केंद्राच्या उभारणीसाठीही हेच तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.