नवी दिल्ली: लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना दिल्लीवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिलाय. गुप्तचर विभागाच्या इशाऱ्यानंतर दिल्ली पोलीसही हरकतीत आलीय. दिल्लीवरून जाणाऱ्या प्रत्येक एअरक्राफ्टवर नजर ठेवण्यात येतेय.
तसंच ड्रोन बाळगणाऱ्या आणि विकणाऱ्या व्यक्तींवर दिल्ली पोलिसांची नजर आहे. त्यांची चौकशी करण्यात येतेय. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड झकिर-उर-रेहमान लख्वीची पाकिस्तान जेलमधून सुटका झाल्यापासून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
रिपोर्ट्सनुसार, लख्वी लाहोरजवळ अतिशय सुरक्षित स्थळी राहतोय. पाकिस्तान आर्मीकडून त्याला सुरक्षा देण्यात येतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.