उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 22 ठार

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून बावीस जणांचा मृत्यू झालाय. उत्तरकाशीमधील गंगोत्री धामचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेली बस दरीत कोसळून ही दुर्घटना झालीय.

Updated: May 24, 2017, 11:37 AM IST
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 22 ठार title=

गंगोत्री : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून बावीस जणांचा मृत्यू झालाय. उत्तरकाशीमधील गंगोत्री धामचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेली बस दरीत कोसळून ही दुर्घटना झालीय. या बसमध्ये 30 प्रवासी होते. या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय. तर, आठ जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

 मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेकजण मध्य प्रदेशातील इंदूरचे रहिवाशी होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलंय. उत्तराखंड सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख आणि जखमींच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. तर मध्य प्रदेश सरकारनंही मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.