लखनऊ : गंगा नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. लखनऊ : उत्तर प्रदेशमधील उन्नाव स्थित गंगा घाट जवळ गंगा नदीच्या पात्रात जवळपास १०४ मृतदेहांचे अवशेष तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली. राज्य प्रशासनाने चौकशीचे आदेश दिलेत.
उनाव जिल्ह्याच्या परियार घाटातील गंगेच्या पात्रात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हे मृतदेह वर आले. हे मृतदेश ग्रामस्तांना दिसलेत. त्यांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. यावर संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेत.
गंगा नदीच्या पात्राजवळच स्मशानभूमी आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कारावेळी कुटुंबिय तेथून निघून गेल्यानंतर अर्धवट जळालेल्या अवस्थेतच मृतदेह गंगा नदीत टाकण्यात येतात. अविवाहित मुलींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार न करता ते मुक्तपणे गंगा नदीत सोडण्यात येतात, अशी माहिती धक्कादायक माहिती ग्रामस्थांनी दिली. ग्रामस्थांकडून अधिक चौकशी केल्यानंतर ही बाब पुढे आलेय.
नदी पात्रात सापडलेले सर्व मृतदेह ओळखता येत नाहीत. तसेच या मृतदेहांची हेळसांड झाल्याने सफाई कामगारांनीही ते उचलण्यास इन्कार केल्याची माहिती पुढे येत आहे. तर, उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सूचना केल्यात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.