www.24taas.com ,वृत्तसंस्था, नवी दिल्ली
फायलीन चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. काही उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
फायलीन चक्रीवादळामुळं प्रवाशांसाठी विमानतळावर व्यवस्था करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. या चक्रीवादळामुळे ओडीशा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत २४तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वादळी वा-यामुळे समुद्र खवळेला असेल त्यामुळे समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना तातडीने किना-यावर परतण्याच्या सूचना देण्यात आल्यात. या वादाचा जबरदस्त तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.