मुंबई: महिला आपली त्वचा सुंदर दिसावी यासाठी प्रत्येक प्रयत्न करतात. महागडी पावडर, क्रिम्स वापरतात पार्लरला जातात तरीसुध्दा हे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात.
आता क्रिम-पावडर न लावता घरच्या घरी तुम्ही हे सोपे उपाय करा. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल.
हे उपाय तुमच्या त्वचेला बनवतील उजळ आणि देतील कोमल त्वचा..
1. व्यायाम: दररोज व्यायाम केल्याने चेहरा उजळेल आणि व्यायाम शरीरासाठी सुध्दा फायदेशीर आहे.
2. चालणे-फिरणे: सकाळी आणि संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरावे, त्याने त्वचा उजळण्यास मदत होईल. आणि त्वचेला ऑक्सिजन मिळाल्याने चेहरा सुंदर दिसेल.
3. पाणी: पाणी जास्त पियावे त्याने अनेक आजार दूर होतात. पाणी आपल्या शरीराला हाइड्रेटेड करतो, त्यामुळे आपला चेहरा चमकदार होतो.
4. स्वच्छता: दिवसभर बाहेर असल्यामुळे चेहऱ्यावर बसणारी धूळ, मातीमुळे त्वचा काळी पडते, त्यामुळे दर 2-3 तासाने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
5. आहार: आहारात जास्त तेलकट तिखट पदार्थ खाणे टाळावे. फळ, पालेभाज्यांचा समावेश आहारात करावा.