मुंबई : कांदा चिरताना बऱ्याचवेळा डोळ्यांतून पाणी येते. कांद्याच्या पेशींमध्ये असणार्या दोन तेलांपैकी एका तेलामध्ये वासयुक्त आणि डोळ्यांना दाहक, चुरचुरणारे ठरणारे असतात. डोळ्यातून अश्रू आणणारे असे हे रसायन असते. या रसायनात एका रेणूत ६ कार्बन, १२ हायड्रोजन आणि २ गंधकाचे अणू असतात.
अमिनो अॅसिड, सल्फोक्सिड अॅसिड आणि अनजाईम अॅसिड याच्यापासून सल्फोनिक अॅसिड तयार होते. त्यामुळे हे अॅसिड हवेत पसरते. आणि डोळ्यांतील अश्रूंमध्ये संयोग पावतात आणि डोळ्यातून पाणी येते.