मुंबई : लठ्ठ लोकांना त्यांच्या अधिक वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. खासकरुन महिलांना. अनेकांना तर त्यांच्या लठ्ठपणामुळे बोलणी सहन करावी लागतात. मात्र #iwontcompromise नावाचे कॅपेन आहे जे लठ्ठ महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सुरु कऱण्यात आलेय.
खासकरुन लठ्ठ माणसांनी योगा करु नये असा सल्ला बरेच जण देतात. योगा करायला जाल आणि काहीतरी भलंतच होईल असे टीकेचे सूरही आळवले जातात. मात्र हाच विचार बदलणारा एक व्हिडीओ बनवण्यात आलाय.
यात एक लठ्ठ महिला योगा करताना दिसतेय. लठ्ठ महिलांसाठी इन्स्पायरिंग तसेच रिफ्रेशिंग करणारा असा हा व्हिडीओ आहे.