दारू चढली, बाटली पोटात उतरली

दारू पिणारे नेहमी म्हणतात, अख्खी बाटली रिचवलीय, मात्र उत्तराखंडमधील ऋषिकेशमधील एका व्यक्तीला पोटात दुखत होतं, औषधं दिल्यानंतरही त्याच्या पोटाचं दुखणं बंद झालं नाही.

Updated: Apr 29, 2014, 04:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, उत्तराखंड
दारू पिणारे नेहमी म्हणतात, अख्खी बाटली रिचवलीय, मात्र उत्तराखंडमधील ऋषिकेशमधील एका व्यक्तीला पोटात दुखत होतं, औषधं दिल्यानंतरही त्याच्या पोटाचं दुखणं बंद झालं नाही.
पोटातील दुखण्याची तक्रार कायम असल्याने या रूग्णाच्या पोटाचा एक्स रे काढण्यात आला आणि डॉक्टर एक्स रेमध्ये पोटात बाटली पाहून दचकले, यासाठी डॉक्टरांना चार ते पाच तास किचकट ऑपरेशन करावं लागलं आणि शेवटी ही वोडकाची बाटली असल्याचं स्पष्ट झालं.
आपल्या पोटात बाटली कशी आली हे आपल्याला माहित नसल्याचं या व्यक्तीने सांगितलं. व्यक्ती विक्षिप्त असल्याचं सांगून कुटुंबियांनी प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.