मोदींकडे काश्मीरमध्ये येण्याचं धैर्य नाही-ओमर

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ओमर अब्दुल्ला यांच्यातील खडाखडी संपण्याचं नाव घेत नाहीय.

Updated: Apr 29, 2014, 01:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, काश्मीर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ओमर अब्दुल्ला यांच्यातील खडाखडी संपण्याचं नाव घेत नाहीय.
नरेंद्र मोदी यांच्यात काश्मीरमध्ये येण्याचं धैर्य नसल्याचं वक्तव्य जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दु्ल्ला यांनी केलंय.
ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलंय, "नरेंद्र मोदी एकवेळ जम्मू आणि श्रीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते झोळीत पाडण्यासाठी मतदारांना साद घालण्यासाठी येतील परंतु, काश्मीरमध्ये येण्याचं धैर्य त्यांच्यात नाही.
याआधी मी मोदींना कलम ३७० वर जाहीर चर्चा करण्याचे आवाहन केले होते. परंतु, मोदींनी त्याला बगल दिली." तसेच भाजप सत्तेत असताना काश्मीर पंडीत समाज काश्मीर सोडून निघून गेला होता.
काश्मीरमधील मुस्लिमांची पंडीत समाज काश्मीरमध्ये परत यावा अशी इच्छा आहे, असंही ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.