मुंबई : सुंदर हास्यासाठी दांतांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते. दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना चमकदार बनवण्यासाठी या फळांचे करा सेवन.
स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे दातांवरील स्टेन निघण्यास मदत होते. एक स्ट्रॉबेरी घ्या त्यावर बेकिंग सोडा टाकून दातांवर घासा,
टरबूज - टरबूजमध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. दातांच्या स्वच्छतेसाठी याचे सेवन फायदेशीर ठरते.
संत्रे - स्वस्थ हिरड्या आणि मजबूत दातांसाठी संत्रे फळ फायदेशीर. यात व्हिटामिन सी आणि कॅल्शियम असते.
सफरचंद - सफरचंद खाणे आरोग्यासाठी नेहमी चांगले. ताजी सफरचंदे खाल्ल्याने दात आणि हिरड्या मजबूत राहतात.
केळं - केळं खाल्ल्याने दातात अडकलेले अन्नकण निघण्यास मदत होते. तसेच केळ्याच्या सालीमुळे दात चमकदार होतात.