हिवाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असल्याची तिची अधिक काळजी घेतली जाते. मात्र त्वचेसोबत हिवाळ्यात डोळ्यांचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात आपण डोळ्यांना हानी पोहोचू नये म्हणून काळजी घेतो त्याचप्रमाणे हिवाळ्यातही अशी काळजी घेतली पाहिजे.

Updated: Dec 12, 2016, 12:58 PM IST
हिवाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी title=

मुंबई : हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असल्याची तिची अधिक काळजी घेतली जाते. मात्र त्वचेसोबत हिवाळ्यात डोळ्यांचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात आपण डोळ्यांना हानी पोहोचू नये म्हणून काळजी घेतो त्याचप्रमाणे हिवाळ्यातही अशी काळजी घेतली पाहिजे.

या आहेत टिप्स

नेहमी गॉगल्स अथवा चष्म्याचा वापर करा - घराबाहेर पडताना नेहमी गॉगल्स घालून बाहेर पडा. 

द्रव्यपदार्थांचे सेवन - हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचेचा ओलावा कायम टिकून राहण्यासाठी द्रव्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करा. पाण्यासोबतच सूप, फळांचे रस यांचा आहारात समावेश करा. 

डोळ्यांच्या ड्रॉप्सचा वापर -  डोळे कोरडे पडत असतील डोळ्यांच्या ड्रॉप्सचा वापर करणे सुरु करा. मात्र कोणते ड्रॉप्स वापरावते याचा डॉक्टरांकडून सल्ला जरुर घ्या.