नवी दिल्ली : आपल्या चेहऱ्यात लपलेय अवर्णीय सौंदर्य आणि तरुण जीवनाचे रहस्य. हे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी योगासन करणे अधिक फायद्याचे ठरते. तुमचा चेहरा ताजेतवान करण्यासाठी योगासन नक्कीच लाभदायी ठरते.
योगा केल्याने आपण आनंदी आणि निरोगी राहू शकतो. योगाचे अनेक फायदे आहेत. तुमचा चेहरा अधिक खुलविण्यासाठी योगा करणे केव्हाही चांगले. सुंदर चेहऱ्यामुळे तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडतो. त्यामुळे चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी योगा करणे अधिक फायदेशीर आहेत. योगा केल्याने तुमची त्वचा चांगली राहते.
चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी आणि ते दीर्घकालीन चिरतरुण ठेवण्यासाठी खालील योगासने करणे लाभदायक आहे.
सिंहाप्रमाणे चेहरा करणे (सिंहासन): हळूहळू श्वास आत घ्या आणि काही काळ तो रोखून धरा. त्यानंत जीभ बाहेर काढा. तसेच आपले डोळे जेवढे उघडा येतील तेवढे उघडण्याचा प्रयत्न करा. या अवस्थेत तुम्ही जेवढे जास्त बसण्याचा प्रयत्न करा आणि जीभ तोंडातून बाहेर काढा. यामुळे आपल्या शरीरातील रक्त भिसरण चांगले राहते. तसेच स्नायूवरील ताण दूर होईल.
माशाप्रमाणे चेहरा करणे (मत्स आसन) : या आसनामध्ये शरीराचा आकार माशाप्रमाणे होतो. त्यामुळे याला मत्सासन म्हणतात. हे आसन करताना तुम्ही दीर्घ श्वास घ्या. श्वास थोडावेळ रोखून धरा. त्याआधी तुम्ही पद्धमासन करुन बसा. पद्धमासन अवस्थेत तुम्ही हळू हळू मागे व्हा आणि पाठीवर सरळ झोपा. याचवेळी दोन्ही गुडघे ठेवण्यासाठी जमिनीवर ठेवा आणि विश्राती घ्या. त्यानंतर दोन्ही हाताच्या मदतीने शिखास्थानप्रमाणे जमिनीवर राहा. त्यानंतर उजव्या पायाचा अंगठा आणि दोन कोणात जमिनीला ठेकविण्याचा प्रयत्न करा. एक मिनिटापासून प्रारंभ करा. तो पाच मिनिटांपर्यंत वाढवा. नंतर हात सोडा आणि हाताच्या मदतीने डोके सरळ करा. त्यानंतर पाठ जमिनिला टेकवा. त्यानंतर हाताच्या सहाय्याने उठा. आसन करताना श्वास-सुस्कारा सामान्य स्थितीत ठेवा.
यामुळे तुमच्या डोळ्याची नजर अधिक वाढते. गळा साफ राहतो. त्यामुळे छाती आणि पोटाचे रोग दूर होतात. रक्ताभिसरणाची गती वाढते. त्यामुळे त्वचा रोग होत नाही. दमा रुग्णांना या आसनापासून लाभ मिळता. तसेच पोटाची चर्बी घटण्यास मदत होती. तर खोखला दूर होतो.
डोळ्यांची कसरत (नेत्रासन) : मोठा श्वास घ्या आणि आपली मान सरळ ठेवा. आपले डोळे डावीकडे वळवा. या अवस्थेत दूर पाहण्याचा काही काळ प्रयत्न करा. त्यानंतर काही सेकंदाने आपले डोळे उजवीकडे वळवा. ही क्रिया पुन्हा करा. तसेच डोळ्याचे बुबूल फिरविण्याच प्रयत्न करा. त्याकडे लक्ष द्या.
गालचा योगा : तुम्ही तोंडात जितकी हवा भरु शकाल तितकी भरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही काही वेळ रोखून धरा. आपला गाल पूर्णत: हवेने भरेल. या अवस्थेत ३० ते ६० सेकंद राहा. त्यानंतर तुम्ही तोंडात घेतलेली हवा. नाकाद्वारे बाहेर सोडण्याचा प्रयत्न करा. ही क्रिया दोन ते तीन वेळा पुन्हा करा.
तळव्यांचा योगा : आपल्या हाताचे तळवे एकमेकांवर घासा किंवा चोळा त्यामुळे ऊर्जा निर्माण होईल. त्यानंतर बंद डोळे तुमचे तळव्याने झाकून घ्या. नंतर दोन्ही नाकांनी श्वास घ्या. त्यानंतर जितका रोखून धरता येईल त्याप्रमाणे रोखून धरा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. आपल्या स्नायू तनावापासून दूर होतील. हे करताना तुमचे डोळे हे उबदार तळव्यांनी पूर्णपणे झाकले जातील.
मानेचा योगा : आपण चांगल्या अवस्थेत सरळ बसा. आपल्या मणक्याच्या हाडांची स्थिती सरळ असावी. आपले हात सरळ असू द्यात. मग हळूवारपणे हात दुमडा. त्यानंतर हात सरळ करा. त्यामुळे मानेच्या दुखण्यापासून सुटका मिळेल. तसेच मानेचे स्नायूंना आराम मिळेल. मान सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
ओठांचा योगा : दीर्घ श्वास घ्या. आपले डोळे बंद करा. आपला चेहरा कडक करा. या स्थितीत तु्म्ही रडण्याचा प्रयत्न करता तो रोखून धरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमचा चेहरा सैल सोडा. अशा अवस्थेत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करा. श्वास रोखून धरा. जेव्हा गरज लागेल तेव्हा श्वास घ्या. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला पूर्णपणे व्यायाम मिळेल आणि तुम्हाला आराम मिळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.