मुंबई : जिम जाणाऱ्या अधिकतम लोकांच्या डोक्यात सेक्सचे विचार घोळत असतात, असं आम्ही नाही तर एक सर्व्हे सांगतोय.
नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये, ५० टक्के लोकांनी हे मान्य केलंय की ते याचा वापर 'हुक अप व्हेन्यू' म्हणून करतात. तर २५ टक्के लोकांनी आपण पार्टनरसोबत जिममध्येच सेक्स केल्याचीही कबुली दिलीय.
सर्व्हेमध्ये 'फ्युजन डॉट नेट'नं सेक्स शॉप 'ऐन समर्स'वर झालेल्या ऑनलाईन पोलचा हवाला दिलाय. या ऑनलाईन पोलमध्ये दोन हजार लोकांनी सहभाग नोंदवला. पोलिंगच्या आकड्यानुसार, २५ टक्के लोकांनी जिम दरम्यान आपण सेक्स केल्याचं कबूल केलंय.
तर इंडिपेंडन्टच्या सर्व्हेच्या रिपोर्टनुसार, ७० टक्के महिलांनी हे मान्य केलंय की सेक्स दरम्यान आपल्या जिम ट्रेनरची छबी त्यांच्या मनात असते.
कधी ना कधी आपल्यालाही 'हुकअप'ची संधी मिळेल, या आशेवर आपण जिम सुरू ठेवलं, असं ६६ टक्के लोकांनी मान्य केलंय. यातील १० टक्के लोक तर कन्डोम घेऊनच जिममध्ये जातात.