वॉशिंग्टन : तुम्ही जर अधिक ताण-तणावाखाली असाल तर याची लवकरात लवकर दखल घ्या... अन्यथा, तुम्हाला लवकरच म्हातारपण येऊ शकतं.
मानसिक आजार 'पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसॉर्डर'नं (पीटीएसडी) त्रस्त असलेल्या लोकांना वेळेपेक्षा लवकर म्हातारपण येण्याचा धोका असतो, असं एका नव्या संशोधनात आढळून आलंय.
पीटीएसडी हा नैराश्य, राग, निद्रानाश, खाण्याचे विकार तसंच मादक द्रव्यांचं सेवन अशा अनेक मानसिक विकारांशी निगडीत आजार आहे.
सॅन डिएगो स्थित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मानसशास्त्राचे प्रोफेरस दिलीप व्ही. जेस्ते यांच्या म्हणण्यानुसार, वेळेपूर्वीच थकवा आणि म्हातारपण येण्यासंबंधी पीटीएसडीशी संबंधित हे पहिलंच अध्ययन आहे. जेस्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबद्दल सविस्तर अभ्यास केलाय.
मानसशास्त्राचे प्रोफेसर जेम्स बी. लोहर यांच्या म्हणण्यानुसार, संशोधनाअंती पीटीएसडी वेळेपूर्वीच येणाऱ्या म्हातारपणाला जबाबदार आहे. परंतु, पीटीएसडीवर आणखीन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण, पीटीएसडी केवळ एक मानसिक आजार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
हे संशोधन 'अमेरिकन जर्नल ऑफ जेरिएट्रिक सायकेट्री'मध्ये प्रकाशित करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.