मनुष्याच्या माकड हाडातही असतो छोटासा मेंदू!

मनुष्याच्या माकडहाडातही एक छोटा मेंदू असतो, असा नवीन शोध अमेरिकन शोधकर्त्यांनी लावलाय. हाच मेंदू आपल्याला गर्दीतून बाहेर पडताना, थंडीच्या दिवसांत बर्फाळ वाटेवरून प्रवास करताना संतुलन राखण्यासाठी मदत करतो तसंच घसरण्यापासून किंवा पडण्यापासून वाचवतो. 

Updated: Feb 2, 2015, 02:28 PM IST
मनुष्याच्या माकड हाडातही असतो छोटासा मेंदू! title=

वॉशिंग्टन : मनुष्याच्या माकडहाडातही एक छोटा मेंदू असतो, असा नवीन शोध अमेरिकन शोधकर्त्यांनी लावलाय. हाच मेंदू आपल्याला गर्दीतून बाहेर पडताना, थंडीच्या दिवसांत बर्फाळ वाटेवरून प्रवास करताना संतुलन राखण्यासाठी मदत करतो तसंच घसरण्यापासून किंवा पडण्यापासून वाचवतो. 
 
या पद्धतीची कार्य अचेतन अवस्थेत होतात. कॉलिफोर्निया स्थित 'साल्क' या एका स्वतंत्र वैज्ञानिक संशोधन संस्थेच्या जीवशास्त्रज्ञ मार्टिन गोल्डिंग यांच्या म्हणण्यानुसार, आपण उभं राहताना किंवा चालताना पायांच्या तळव्यांचे संवेदनशील भाग या छोट्या मेंदूला दबाव आणि गतीशी निगडीत सूचना पाठवतात. त्यांच्या मते, या अभ्यासातून आपल्या शरीरारात उपस्थित असलेला 'ब्लॅक बॉक्स'चाच शोध लागलाय. 

शास्त्रज्ञांना आजपर्यंत आपल्या शरीरातील हे संकेत आपल्या माकड हाडापर्यंत पोहचतात आणि कार्यरत होतात हे माहीत नव्हतं. परंतु, या शोधानुसार, प्रत्येक मिलीसेकंदांवर सूचनांचे वेगवेगळे प्रवाह मेंदूत प्रवाहित होत राहतात. यामध्ये, शोधकर्त्यांनी शोधलेले संकेतांचाही समावेश आहे. 

गोल्डिंगच्या टीमनं हा प्रयोग एका उंदरावरही करून पाहिलाय. त्यांनी एका उंदराच्या माकड हाडातील आरओआरआय न्यूरॉन निष्क्रिय केला. त्यानंतर त्या उंदराची गतीत संवेदनशीलता कमी झाली होती. हा शोध 'सेल' पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.