लॉस एंजेलिस: एका रिसर्चमध्ये महिलांसाठी एक विशेष बाब पुढे आलीय. महिलांमध्ये कॉस्मेटिक्सच्या वापरानं वेळेपूर्वीच मासिक पाळी बंद होऊ शकते. रिसर्च नुसार, लिपस्टिक, फेस क्रीम आणि नेल पेंटमध्ये असलेलं रासायनिक तत्व मासिक पाळीची प्रक्रिया चार वर्षानं कमी करते.
रिसर्च दरम्यान सेंट लुईसमध्ये असलेल्या वॉशिंग्टन युनिवर्सिटीचे रिसर्चर्सने ३१,५७५ महिलांवर १११ रसायनांच्या प्रभावाचा अभ्यास केला आणि १५ रसायने नुकसानकारक असल्याचं निदर्शनास आलंय.
वेबसाइट 'डेलीमेल डॉट को डॉट यूके'नुसार यातील अनेक नुकसानकारक रसायन घरगुती वस्तू आणि कॉस्मेटिक्स, परफ्यूम, लिपस्टिक, बॉडी वॉश, हेअर केअर प्रसाधन, नेल वार्निश इत्यादींमध्ये सापडले.
ज्या महिलांच्या शरीरात नुकसानकारक केमिकल हाय लेव्हलमध्ये सापडले. त्यांची मासिक पाळी बंद होण्याच्या दोन-चार वर्षांपूर्वी झाल्याचं निदर्शनास आलं.
रिसर्चमध्ये आढळलं की, वेळेआधीच मासिक पाळी बंद होणं किंवा गर्भाशय निष्क्रिय होणं न केवळ प्रजनन क्षमतेला प्रभावित करतं, तर यामुळं महिलांना हृदयाचे आजार, ऑस्टेओपोरोसिस आणि इतर आजारांची भीती जास्त असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.