स्मोकिंगपेक्षा जास्त खतरनाक आहे... खुर्चीत बसणं!

तुम्हाला माहिती आहे का? की, जास्त वेळ खुर्चीमध्ये बसून राहणे हे आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे. सतत खुर्चीत बसणे ही ‘स्मोकिंग’ पेक्षा ही जास्त वाईट सवय असल्याचे एका सर्वेद्वारे सांगण्यात आले आहे.  

Updated: Sep 18, 2014, 07:37 AM IST
स्मोकिंगपेक्षा जास्त खतरनाक आहे... खुर्चीत बसणं! title=

मुंबई : तुम्हाला माहिती आहे का? की, जास्त वेळ खुर्चीमध्ये बसून राहणे हे आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे. सतत खुर्चीत बसणे ही ‘स्मोकिंग’ पेक्षा ही जास्त वाईट सवय असल्याचे एका सर्वेद्वारे सांगण्यात आले आहे. त्याला ‘न्यू स्मोकिंग’ असे नाव देण्यात आले आहे. तुम्ही दिवसभरातील जास्त वेळ जर सोफ्यावर बसणे, ऑफिसमधील खुर्चीमध्ये बसून किंवा गाडीत बसून फिरण्यासाठी जाता. जर यासर्व गोष्टी तुम्ही करत असाल तर सावधान!... कारण याने मधुमेह, हार्ट डिसीज आणि अकाली मृत्यू यांचा धोका वाढू शकतो. या गोष्टी याच सर्वेतून अनेकदा आपल्यासमोर आल्या आहेत.
काळजी घेण्यासाठी -

थोडा ब्रेक घेणे गरजेचे -

तासंतास एकाच ठिकाणी बसून काम करणे टाळा. थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेणे गरजेचे आहे. जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहिल्याने तुम्हाला तणाव आणि डोकेदुखी सारख्या समस्येलासामोरे जावे लागेल. यासाठी तुम्ही खुर्ची सोडून ऑफिसमधील कॅफीटीरियापर्यंत चालत जा...त्यामुळे डोक्याला आराम मिळेल. आणि त्याचबरोबर तणावापासून देखील तुम्ही वाचू शकता.

स्ट्रेचिंग एक्ससाईज करणे गरजेचे -

एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्याने आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील सर्व एनर्जी संपून जाते. थोड्या वेळाने तुम्हाला कंटाळा येऊन थकवा जाणवू लागतो. त्यासाठी तुम्ही अधून-मधून स्ट्रेचिंग एक्ससाईज करणे गरजेचे आहे.

 

वाईट परिणाम

सिटिंग जॉबमध्ये कॅलेरी बर्निंग रेट प्रति मिनिटला कमी होतो. तर फॅट ब्रेक डाउन करणारे एंजाइम्स 90 टक्के कमी होत जातात.

नुकसान -

जे लोक स्टॅन्डिग जॉब करतात त्यांच्या तुलनेत सिटिंग जॉब्स करणाऱ्यांमध्ये दुप्पटीने हृदय रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते.

धोक्याची घंटा -

अमेरिकन कॅन्सर सोसायटीने 2010मध्ये 14 वर्षापासून चालेल्या रिसर्चमध्ये असे दिसून आले की, जे पुरुष आणि महिला दररोज 6 तासापेक्षा जास्त वेळ बसून काम करतात. त्यामध्ये 20 टक्के पुरूष आणि 40 टक्के महिला यांच्यावर मृत्यूचा धोका वाढत जात आहे. तसेच गेल्यावर्षी लीसेस्टर यूनिवर्सिटी त्यांच्या एका संयुक्त स्टडीमध्ये असे सांगितले की, जे लोक नियमित एक्ससार्इज करतात. पण बाकीच्या वेळात बसून राहतात ते देखील धोकादायक असते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.