हिवाळ्यात अशी घ्या भेगांपासून पायाची काळजी

हिवाळ्यात पायांना भेगा पडल्यास बर्‍याच वेदना होतात. पायांचे सौंदर्यही देखील यामुळे नष्ट होतं. पण काही घरगुती उपायाने भेगांवर तुम्ही उपाय करु शकता.

Updated: Dec 15, 2016, 04:50 PM IST
हिवाळ्यात अशी घ्या भेगांपासून पायाची काळजी title=

मुंबई : हिवाळ्यात पायांना भेगा पडल्यास बर्‍याच वेदना होतात. पायांचे सौंदर्यही देखील यामुळे नष्ट होतं. पण काही घरगुती उपायाने भेगांवर तुम्ही उपाय करु शकता.

1. झोपताना पाय स्वच्छ धुवून मॉईश्चराईज्ड क्रिम लावल्यास त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो.

2. कडूलिंबाचा पाला कुटून त्याचा रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.

3. लोणी, आंबीहळद आणि मीठ यांचं मिश्रण करून रोज पायांना लावल्यास आराम मिळतो.

4. बोरिक पावडर, जैतून तेल, व्हॅसलिन हे एकत्रित करून भेगांमध्ये भरल्यास त्याने देखील त्रास कमी होतो. हळदीमध्ये कोमट तेल टाकून ते मिश्रण भेगांमध्ये भरल्यासही हा त्रास कमी होतो.

5. चंदन उगळून भेगांमध्ये त्याचा लेप लावल्याने भेगा कमी होतात. ग्लिसरिन, गुलाबपाणी, लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश केल्यानेही भेगा कमी होतात.