मुंबई : मोठ्या शहरांमध्ये लाईफ स्टाईल मोठ्या प्रमाणात बदललं आहे, यामुळे रात्री झोपण्यास उशीर होतो, मुंबई, पुण्यासारख्या शहरात रात्री उशीरापर्यंत काम करावे लागते, किंवा रात्रपाळी करावी लागते अशा लोकांची संख्या देखील मोठी आहे.
रात्रपाळी करणारे आणि रात्री उशीरा झोपणाऱ्या लोकांसाठी आयुर्वेदात विचार करण्यात आला आहे. रात्री जागणाऱ्या किंवा झोपणाऱ्या लोकांमध्ये रूक्षता वाढीस लागते, ती घालवण्यासाठी आहारात दूध, साजूक तूप, लोणी, काळ्या मनुका असे पदार्थ सेवन केल्यास ते आरोग्यदायी ठरतं.
याशिवाय लहान मुले, वयोवृद्ध, रूग्ण व्यक्ती यांनाही लवकर उठणे सोपे नाही, अवघडच असते, त्यामुळे अशा सर्व लोकांना उशीरा उठण्यास आयुर्वेदाने परवानगी दिली आहे. लहान मुलांची उंची सर्वाधिक झोपेत असतानाच वाढते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.