www.24taas.com झी मीडिया, नवी दिल्ली
आपण लहानपणापासून एकच गोष्ट विज्ञानाच्या पुस्तकात शिकत आलो आहोत. ती म्हणजे आपल्या शरीरात एक रोग प्रतिरोधक पेशी असते. ही पेशी आपल्याला रोगांपासून दूर ठेवते, होणाऱ्या रोगांपासून आपले संरक्षण करण्याचे काम करते. पण आताच वैज्ञानिकांनी एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी कॅन्सरला नष्ट करणाऱ्या प्रतिरोधक पेशीचा शोध लागला आहे.
ही पेशी कॅन्सरच्या जिवाणूंशी लढत असते. त्यामुळं या प्रतिरोधक पेशीला ‘माइलोईड डिराईव्ह सप्रेसर सेल्स’ असं नाव देण्यात आलंय. याचाच अर्थ ही पेशी कॅन्सरच्या जिवाणूंना पूर्णपणे नष्ट करते.
विज्ञानाच्या इम्यूनिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका तपशीलानुसार, कॅन्सरच्या स्टेम पेशी या रासायनिक संयुगं वापरून केलेली रोगाची विशिष्ट प्रकारची प्रतिरोधक शक्ती मानली जाते. वैज्ञानिकांच्या मते, कॅन्सरला नष्ट करायचं असेल तर प्रथम कॅन्सरचे स्टेम पेशींना नष्ट करणं फार गरजेचं आहे. काही शोधकर्त्यांनी तर कॅन्सरच्या धोकादायक असणाऱ्या पेशींचा शोध लावला आहे. ज्यानं कॅन्सर पुन्हा होऊ शकतो.
कॅन्सरला नष्ट करणाऱ्या पेशींचा शोध लागला तर कॅन्सर ज्या विषाणूंमुळं होतो त्या विषाणूंशी लढण्यासाठी या पेशींचा जास्त उपयोग होईल आणि कॅन्सरचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.