अन्नपचनास कोण मदत करते ?

आपण जे खातो, ते आपल्याला पचले नाही तर? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही एवढेच करा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम करावा.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 16, 2013, 11:46 AM IST

www.24taas.com,मुंबई
आपण जे खातो, ते आपल्याला पचले नाही तर? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही एवढेच करा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम करावा.
व्यायाम केल्याने आपल्या शरीराला बळकटी मिळते शिवाय आकर्षकपणा येतो. व्यायाम ही अत्यंत गरजेची बाब आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारतं. या रक्तभिसरणमुळे अन्न पचनास मदत होते.
अतिरिक्त कॅलरीज जाळल्या जातात. मात्र व्यायाम किती करावा यावरही निर्बंध, हवे बरे का? रोज किमान तीस ते साठ मिनिटं व्यायाम केलाच पाहिजे. गरजेपेक्षा जास्त व्यायाम केला, तर स्नायूंची वाढ होते आणि वजनही वाढतं.

चटणी-लोणचं आरोग्याला चांगलं का ?
आपल्या जेवणात प्रामुख्याने बरेचवेळा चटणी आणि लोणचं असतं. तेलकट, तिखट आणि आंबट खल्ल्याने प्रकृतिच्या तक्रारी वाढतात. किंवा पचनाचा त्रास होतो असा समज आहे. ही चटणी-लोणची खावीत का, असा तुम्हाला सततचा प्रश्न सतावत असतो. मात्र, आहारात तोंडीलावणं म्हणून खाल्याने त्याने आरोग्यास काहीही अपाय होत नाही.
आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये सांगितल्या गेलेल्या सगळ्या चटण्या या चांगल्या आहेत. त्या खायला काहीच हरकत नाही. कारळ्याची, शेंगदाण्याची, कढीपत्त्याची कसलीही चटणी असू दे, आहारात असने आवश्यक आहे. उलट चटण्या या आरोग्यासाठी चांगल्याच असतात.
तीच गोष्ट लोणच्याची आहे. लोणचं मुरवलेलं असतं. त्यामुळे त्यात प्रो-बायोटिक बॅक्टेरिया असतो. मुख्य जेवणाबरोबर जेव्हा आपण लोणचं खातो, तेव्हा हाच प्रोबायोटिक बॅक्टेरिया चांगलं काम करतो. नुसतं लोणचं खाऊ नये. आपल्या आहार शैलीत चटण्या-लोणच्याला महत्त्व आहे, हे मात्र नक्की.