मुंबई : पंजी पटेल या ६० वर्षांच्या महिला या वयात आई बनून खूपच खूश आहेत. मुंबईतील या महिलेने ३.९ किलोच्या बाळाला जन्म दिला. इन-विट्रो फर्टीलाइजेशन प्रक्रीयेच्या माध्यमातून महिलेने बाळाला जन्म दिला. या वयात ही प्रक्रिया करणे खूपच अवघड गोष्ट आहे.
पंजी या कच्छ येथील रहिवासी आहे. त्यांनी ३५ वर्षांपूर्वी रणछोड यांच्याशी लग्न केले. दोन्ही गेल्या १० वर्षांपासून मुंबईत राहत आहेत. पंजी या आई बनण्याचा प्रयत्न करीत होत्या त्यात त्यांना मोनोपॉजचा सामना करावा लागला. यानंतर अनेक इलाज आणि प्रयत्नानंतर त्या आई बनू शकल्या नाहीत.
वय जास्त असले तरी त्या एका बाळाला जन्म देऊ इच्छित होत्या. याचा दुसरा मार्ग आयव्हीएफ तंत्रज्ञान होते. पंजी या आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गर्भवती झाल्या. आयव्हीएफ विशेतज्ज्ञ डॉ. मेहुल दमानी यांनी सांगितले, की हार्मोनच्या अभावामुळे या महिलेचा गर्भाशय खूप छोटा झाला होता. या केसमध्ये आई बनणे खूप अवघड होते. पण त्यांची तीव्र इच्छा असल्याने त्यांनी बाळाला जन्म दिला.
गेल्या वर्षी आयव्हीएफ तंत्रज्ञानाने त्यांच्या पतींचे स्पर्मने भ्रूण तयार करण्यात आला. बाळ झाल्यावर दोन्ही पती-पत्नी खूश आहेत. हे चमत्कारापेक्षा कमी नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.