नवी दिल्ली : चेहऱ्याला स्वस्थ ठेवण्यासाठी तसंच चेहऱ्याची चमक नेहमी कायम राखण्यासाठी मुलतानी माती खूपच फायदेशीर ठरते.
चेहऱ्यावर मुरुमं असेल तर किंवा त्वचा तेलकट होण्यापासून रोखण्यासाठी मुलतानी माती मदत करते. तुम्हीही मुलतानी मातीचा लेप तुमच्या चेहऱ्यासाठी वापरला तर नकोशा असलेल्या पिंपल्सपासून सुटका मिळेल. तसंच चेहऱ्यावर तेजही परतेल आणि तुमची त्वचा कोमलही होईल.
जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स, फोड्या असतील तर आठवड्यातून एकदा मुलतानी मातीत कपूर मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला आराम मिळेल आणि या त्रासापासूनही सुटका होईल.
काही लोकांची त्वचा संवेदनशील असतो अशा वेळी मुलतानी मातीचा वापर आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा करू नये.
तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळवण्यासाठी मुलतानी मातीत दही आणि पुदीन्याच्या पानांची पावडर मिसळून लावावी. गुलाब जल आणि मुलतानी माती मिसळूनही चेहऱ्यावर लावता येईल.
याशिवाय मुरुमांपासून सुटका करून घेण्यासाठी मुलतानी मातीत सुकलेल्या लिंबाची पानं मिसळून लावता येतील.
डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काकडीचा रस आणि उकडलेला बटाटा मुलतानी मातीत मिसळून डोळ्यांखाली लावून १०-१५ ठेवता येतील.
तुमचा त्वचा क्षुष्क आणि कोरडी असेल तर मुलतानी मातीत चंदन पावडर मिसळून लावा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.