मुंबई : मीठ अर्थात सोडियमचे योग्य प्रमाणात सेवन शरीरासाठी फायदेशीर असते. लिंबूमध्ये व्हिटामिन सी असते. तसेच काळी मिरीला तर किंग ऑफ स्पाईस म्हटले जाते. यात अनेक औषधी गुण असतात. हे तीनही पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक आजारांचा खात्मा करतात.
1. सर्दी, कफाचा त्रास असल्यास मीठ, लिंबू आणि काळी मिरी यांचे एकत्रित मिश्रण करुन घ्यावे. यामुळे आराम मिळतो.
2. मुतखड्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी मीठ, लिंबू आणि काळी मिरीचे मिश्रण एरंडेल तेलासोबत नियमित घ्यावे.
3. दातांतून रक्त येत असेल, दातदुखीचा त्रास सतावत असेल तर मीठ, लिंबू आणि काळी मिरीचे मिश्रणाच्या गरम पाण्यासोबत गुळण्या करा.
4. बद्धकोष्ठाचा त्रास सतावल्यास लिंबाचा अर्धा तुकड्यात काळी मिरी आणि लिंबू भरा. याला तव्यावर थोडेसे गरम करुन लिंबाची फोड चोखण्यास द्या. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होईल.
5. मलेरियाचा आजार झाल्यास लिंबामध्ये लिंबाचा अर्धा तुकड्यात काळी मिरी आणि लिंबू भरा. याला तव्यावर थोडेसे गरम करुन लिंबाची फोड चोखा. यामुळे ताप कमी होईल.