जाणून घ्या हे बदामाचे १० फायदे

सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असतो असे लोक मानतात. असे असले तरी शेंगदाणे आणि काजू सोडल्यास अन्य प्रकारचा सुका मेवा चरबी वाढवत नाही. बदाम, पिस्ता, बेदाणा, अंजीर यांच्या सेवनाने चरबी वाढत नाही. सुका मेव्यामधील बदामात सर्वात लो फॅट असतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे. बदाम हा स्मरणशक्ती द्रृढ करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याच बरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.

Updated: May 30, 2016, 01:37 PM IST
जाणून घ्या हे बदामाचे १० फायदे title=

मुंबई : सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असतो असे लोक मानतात. असे असले तरी शेंगदाणे आणि काजू सोडल्यास अन्य प्रकारचा सुका मेवा चरबी वाढवत नाही. बदाम, पिस्ता, बेदाणा, अंजीर यांच्या सेवनाने चरबी वाढत नाही. सुका मेव्यामधील बदामात सर्वात लो फॅट असतात. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे. बदाम हा स्मरणशक्ती द्रृढ करण्यासाठी फायदेशीर आहे. त्याच बरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.

बदामाचे हे १० फायदे

१. भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात.
२. बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.
३. बदामाने काही काळ भूक भागवली जाते.
४. डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम खातात. डाएटिंग करणारे भूक लागल्यास इतर पदार्थांपेक्षा १२ बदाम खातात. हे बारा बदाम एका ब्रेकफास्टचे काम करते.
५. बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाहीत.
६. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते.
७. बदामाची साल कोरडी असल्याने सहसा लोक ती काढून टाकतात. पण ही साल शरीरातील रक्त पातळी वाढवण्यास मदत करतात. म्हणून बदाम हे सालासकट खाल्ले पाहीजेत.
८. बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते.
९. बदामामुळे कोरडी त्वचा असणार्‍यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते.
१०. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.