कडूलिंबाच्या तेलाचे फायदे

कडूलिंब हा निसर्गाने मनुष्याला दिलेले एक वरदानच म्हटले पाहिजे. कारण या झाडाची पाने, बिया आणि मूळदेखील उपयुक्त आहे. अनेक रोगांवर त्यांचा वापर केल्यास तो रामबाण इलाज ठरतो. कडूलिंबाच्या बियांमधून काढलेले तेल अनेक कारणांसाठी उपयोगी पडते. हे तेल फिकट हिरव्या रंगाचे असून चवीला ते तिखट असते. 

Updated: Apr 27, 2015, 11:47 AM IST
कडूलिंबाच्या तेलाचे फायदे  title=

मुंबई: कडूलिंब हा निसर्गाने मनुष्याला दिलेले एक वरदानच म्हटले पाहिजे. कारण या झाडाची पाने, बिया आणि मूळदेखील उपयुक्त आहे. अनेक रोगांवर त्यांचा वापर केल्यास तो रामबाण इलाज ठरतो. कडूलिंबाच्या बियांमधून काढलेले तेल अनेक कारणांसाठी उपयोगी पडते. हे तेल फिकट हिरव्या रंगाचे असून चवीला ते तिखट असते. 

कडूलिंबाच्या तेलाचे फायदे-
- दातदुखी, हिरड्यांना येणारी सूज या सगळ्या विकारांवर कडूलिंबाच्या तेलाने दात घासायला हवेत. हा एक रामबाण इलाज आहे.
- अख्खे कडूलिंबाचे झाडच अॅण्टिसेप्टिक गुणांनी भरलेले आहे. एक्झिमा रोगात हातापायांना येणारी सूज, खाज कमी करण्यासाठी कडूलिंबाचे तेल लावल्यास खूप फरक पडतो.
- कडूलिंबाच्या पानांचा रस गरम पाण्यात घालून ते मिश्रण चेहर्‍याला लावल्यास चेहर्‍यावरील डाग, मुरूमे इतकेच नव्हे तर चेहर्‍यावरील सुरकुत्याही नाहीशा होतात. कडूलिंबाची पाने आणि संत्र्याच्या साली गरम पाण्यात उकळवून त्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहर्‍यावरील मुरूमे घालवता येतात.
- जखम किंवा खरचटल्यास कडूलिंबाचे तेल लावल्यास त्यातील रसायनामुळे जखम चटकन भरून निघते.
- कडूलिंबाचे तेल वापरल्यास मलेरियासारखा रोगही दूर पळतो. कडूलिंबाचे तेल डोक्यात केसांच्या मुळाशी चोळल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.