कॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ....

भारतात दिवसेंदिवस कॅन्सर पेशंट वाढत चालले आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी काही घरगुती उपयोगातील उपाय म्हणून फळ, भाज्या, धान्ये, कडधान्ये, जरूरी विटामिन्स, खनिजे उपयोगी पडू शकतात. पुढे आपण पाहूया कॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ

Updated: Jan 21, 2015, 06:25 PM IST
कॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ.... title=

मुंबई : भारतात दिवसेंदिवस कॅन्सर पेशंट वाढत चालले आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी काही घरगुती उपयोगातील उपाय म्हणून फळ, भाज्या, धान्ये, कडधान्ये, जरूरी विटामिन्स, खनिजे उपयोगी पडू शकतात. पुढे आपण पाहूया कॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ

१)  कांदा आणि लसून : कांदा आणि लसूनमधे असलेले सल्फर संयुगे मोठे आतडे, स्तन, फुफ्फुस आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना मारते. लसूनमुळे उच्च रक्तदाबही नियंत्रणात राखला जातो. यामुळे शरिरात इंसुलिनचे उत्पादन कमी होउन शरिरात ट्युमर होउ देत नाही.

२) भाज्या :  फ्लावर आणि ब्रोकोली हे दोन कॅन्सरविरोधी शक्तीशाली अणू आहेत. या दोन भाज्या डिटोक्सीफिकेशनव्दारे सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य वाढवते, ज्यामुळे शरिरात निर्माण होणाऱ्या कॅन्सरच्या पेशी मारते आणि ट्युमरला वाढण्यापासून कमी करते तसेच फुफ्फुसं, प्रोस्टेट, मूत्रपिंड आणि पोटाचा कॅन्सर कमी करण्यासही मदत करतात.

३) आलं :  ताज्या आल्यामध्ये कॅन्सरच्या पेशींशी लढण्याचे खास गुण आहेत आणि याच्या मदतीने ट्युमरच्या पेशीही रोखण्यास मदत होते. आल्याचा अर्कामुळे कीमोथेरेपी किंवा  रेडियोथेरेपीपासून होणारा त्रास कमी केला जातो.

४) हळद : हे सगळ्यात शक्तीशाली असे नैसर्गिक कॅन्सरविरोधक आहे. हळद हे कॅन्सर पेशींना मारते तसेच ट्युमरलाही वाढण्यापासून रोखते आणि त्याचबरोबर किमोथेरपीचा प्रभाव वाढवते. हळदीमध्ये काळीमिरी आणि तेल एकत्र करूनही अधिक परिणामकारक होते.

५) पपई, किवी आणि संत्र : या फळांमधे भरपूर विटामिन असते ज्याव्दारे लिव्हरमधे असणारे कार्सिनोजन या फळांच्या सेवनाने आपोआपच कमी व्हायला मदत करते. किवीच्या सालामध्ये फ्लेवनोइड्स आणि नोबिलेटिन नावाचे तत्व असते ज्याव्दारे कॅन्सरच्या पेशी रोखण्याची क्षमता असते.

६) गाजर, आंबा आणि रताळ :  अल्फा आणि बीटा नावाचे कॅरेटिन्स कॅन्सरला नाहीसे करणारे शक्तीशाली घटक आहेत. हे तीन फळं गर्भाशय, मूत्रपिंड, पोट आणि स्तन इ. सारखे विविध प्रकारचे कॅन्सर रोखण्यास उपयोगी आहेत.

७) द्राक्षे :  याव्दारे एंथोसायनिन आणि पुलीफेनल्स यांच्या मदतीने शरिरातील उत्पादित होणारे कॅन्सरचे कण कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावत आहे.

८) टोमॅटो आणि टरबूज : हे लाइकोपीन चे मुख्य स्त्रोत आहे, ज्याला एक शक्तीशाली  एंटीऑक्सीडेंट मानले जाते. हे सेलुलरचे नुकसान होण्यापासून थांबवते. आठवड्यातून एकदा टोमॅटोचा एक दशांश भाग आहारात घेतल्याने प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण    18 टक्क्यांनी  कमी होते.

९) डाळी आणि सोयाबीन : डाळी आणि सोयाबीन हे प्रोटीन वाढवीण्याचे एक प्रमुख स्त्रोत आहे तसेच फायबरही याव्दारे मिळते ज्याव्दारे पैनक्रियाज़ च्या कॅन्सरचा धोका कमी होतो. सोयाबीनमध्ये वेगळ्याप्रकारचा स्टार्च असतो ज्याव्दारे मोठ्या  आतड्यांमधील पेशींचे स्वास्थ सुधारण्यास मदत होते.

 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.