नवी दिल्ली : वाढतं तपमान, आग ओकणारा सूर्य आणि त्यातच अपचन... यामुळे अनेक जण डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. अशा वेळी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. त्यामुळे, कडक उन्हातही शरीराची 'इम्युनिटी' कायम राहते.
डॉ़क्टरांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्यात व्यक्तीच्या शरीरातून अधिक घाम येत असल्यामुळे 'इलेक्ट्रोलाइट' असंतुलित होतो. उन्हाळ्यात अधिक उष्ण फळ आणि भाज्या टाळाव्यात. त्यामुळे, विविध आजारांपासून सहज दूर राहता येतं.
कामासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना स्वत:ची रोगप्रतिकार क्षमताही वाढवण्याची गरज असते. त्यासाठी, शक्यतो न्याहारीत दूध, फ्रूटशेक, ज्यूस, फळं, कडधान्य, ओटस्, पोहे इत्यादी पदार्थ असावेत. तर दुपारी जेवताना विविध डालींचा समावेश असावा. हिरव्या पानांच्या भाज्या, दोन-तीन चपात्या आणि भरपूर सलाड तुमच्या जेवणात असेल, याचंही ध्यान ठेवा.
रात्री जेवताना जड आणि गरजेपेक्षा जास्त जेवण टाळा. रात्रीच्या जेवणात रस्सेदार भाज्या, दोन चपात्या आणि सलाड घ्या. चपात्या खायच्या नसतील तर तुम्ही खिचडीही खाऊ शकता.
काय काय कराल
- ग्रीन टी आणि कोल्ड कॉफी घ्या
- हलकं फुलकं जेवण घ्या
- टरबूज, खरबूज, काकडी अशी सिझनल फळं खाऊ-
- पाणीदार खाद्य पदार्थ घ्या
- भोजनादरम्यान मोठा गॅप असू नये
- अपचणाचा त्रास जाणवत असल्यास लिंबू पाणी आणि पुदीना पाणी प्या
- जेवढं जास्त पाणी पिता येईल तेवढं प्या
- बाजारातील पेयपदार्थांऐवजी दही, ताक, लस्सी, नारळ पाणी अशा पदार्थांना प्राधान्य द्या
कोणत्या गोष्टी टाळाल
- तळलेले पदार्थ टाळा
- गरम फळं उदाहरणार्थ चेरी, पेरू, आंबे अशी फळं प्रमाणात खा
- लंचचा टिफीनमध्ये पाच ते सहा तास अगोदरच खा. कारण, जास्त वेळ पॅक राहिल्यामुळे यामध्ये बॅक्टेरिया तयार होऊ शकतात.
- चहा आणि गरम कॉफीपासून दूर राहा
- शक्यतो उन्हाळ्यात ड्रायफ्रूटस टाळा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.