नवी दिल्ली : ऑफिसमध्ये आणि घरीही तुमच्या दिवसातला जास्तीत जास्त वेळ तुम्ही कम्युटरला देत असाल तर तुमच्यासाठी स्वत:ला देण्यासाठी नक्कीच वेळ मिळत नसेल... होय ना... अर्थातच, एक प्रकारचा कंटाळा, उदासपणा तुमच्यात दिसून येत असेल तर इतरांसाठी तुमचं व्यक्तीमत्त्व थोडं नकारार्थी ठरू शकतं. पण, काम तर करावंच लागणार आहे... मग काय करायचं?
सोप्पं आहे... अडचणी आहेत तर त्यावर उपायही आहेत... तुम्ही तुमचं कम्प्युटरवरचं काम सुरु ठेवतानाच स्वत:ला आनंदी ठेऊ शकता... तेही कोणत्याही थकावटीशिवाय... जर तुम्हीही कम्प्युटरवर जास्त वेळ काम करताना स्वत:ची इतर कामं मनापासून आनंद घेऊन करू शकत नसाल तर तुमच्यासाठीच आहेत या काही अगदी साध्या आणि सोप्या टीप्स... यामुळे, तुम्ही जास्तीत जास्त वेळ कम्प्युटरवर काम केल्यानंतरही स्वत:ला फ्रेश फिल करून द्याल...
- सर्वात अगोदर काही कराल तर ते म्हणजे, कम्प्युटरचा विनाकारण वापर करणं टाळा...
- कम्प्युटरवर काम करताना तुमची खुर्ची योग्य उंचीवर असणं गरजेचं आहे... ज्यामुळे, तुमच्या हातांना आणि डोळ्यांना त्रास होणार नाही अशा उंचीवर खुर्ची अॅडजस्ट करा.
- खुर्चीला पाठ टेकून बसा त्यामुळे बसताना तुमच्या कंबरेला, पाठिला आणि हातांना सपोर्ट मिळेल.
- की-बोर्ड आणि माऊसला ९० डिग्रीच्या कोणावर तुमचा कोपरा राहील अशा पद्धतीनं अडजस्ट करा. कीबोर्ड थोडं खाली असेल तर चांगलंच..
- खुर्चीवर बसताना मांडी जमिनीला समांतर राहील याची काळजी घ्या. पाय खुर्चीवर लोंबकळत न ठेवता गरज असल्यास असल्यास पायांखाली एखादा छोटा स्टुल घ्या.
- कम्प्युटरवर कार्य करताना फोनवर बोलत असाल तर मान आणि खांद्यावर फोन पकडून बोलणं टाळा.
- तुमचं काम करताना तुमचं शरीर सहज ठेवा आणि मनालाही शांत ठेवा
- कीबोर्ड, माऊसचा कमी वापर करण्यासाठी आवाजावर काम करणारं सॉफ्टवेअरचा वापरही तुम्ही करू शकाल.
- मॉनिटरची लाईट, परावर्तन कमी करण्यासाठी अॅन्टीग्लेअर कोटिंग चष्मा वापरू शकता.
- हाताशी पाण्याची बाटली ठेवा... जेणेकरून काम करता करता मध्येच एक एक घोट तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे, तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य राहील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.