मुंबई : असंतुलित आहार घेतल्याने अथवा जागरण झाल्याने तोंड येण्याची समस्या निर्माण होते. तोंड आल्यास काहीही खाणे मुश्कील होऊन जाते. खाणे तर दूरच पाणी पिणेही कठीण जाते. मात्र घरगुती उपचारांनी तुम्ही हे बरे करु शकता. पोटाच्या समस्या, असंतुलित आहार, पान-मसाल्याचे सेवन हे तोंड येण्यामागची प्रमुख कारणे आहेत.
तोंड आल्यास हे उपचार जरुर करा
एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि या पाण्याच्या गुळण्या करा. दिवसातून दोन ते तीनवेळा असं करा. यामुळे आलेले तोंड बरे होण्यास मदत होईल.
मधात मुलेठीचे चू्र्ण मिसळून याचा लेप तोंड आलेल्या ठिकाणी लावा.
अडुळसाची पाने चावून खा. त्याच्या रसामुळे आलेले तोंड बरे होते.
अधिकाधिक पाणी प्या. यामुळे पोट साफ होईल आणि तोंड येणार नाही.
ताकाने दिवसातून तीन ते चारवेळा गुळण्या केल्यास तोंड बरे होते.
जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यास या समस्येपासून आराम मिळतो.