नवी दिल्ली : बॉडी बनवण्यासाठी जिम जाण्याचं फॅड हल्ली तरुणांमध्ये वाढलेलं दिसतयं. मात्र केवळ जिम जाण्याने बॉ़डी होणार नाही तर त्यासाठी आवश्यक आहे हेल्दी डाएट.
बॉडी बनवायची आहे तर हे घ्या १० हेल्दी डाएट
सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्सचा वापर करा. यात मोठ्या प्रमाणावर फायबर असते. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते आणि मसल्स बनतात.
बॉडी बनवण्यासाठी आहारत नेहमी अंड्याचा समावेश करा. यात व्हिटामिन ए, डी, ई तसेच कोलाईन, हेल्दी कोलेस्टेरॉल आणि प्रोटीन असतात.
पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. जे मसल्स बनवण्यासाठी जरुरी असते.
केळ्यात पोटॅशियम, कॅल्शियम अधिक मात्रामध्ये असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
पालकमध्ये व्हिटामिन के आणि लोह अधिक प्रमाणात असते. यामुळे शरीर मजबूत बनते.
मिरचीमुळे रक्तसंचार नीट होतो. यातील बीटा कॅरोटीन मेटाबोल्जिम नीट ठेवते.
ग्रीन टीमध्ये चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सिंडेंट्स असतात. यामुळे प्रतिकारक क्षमता वाढते.
रताळे हे कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे. शरीराला उर्जा मिळते.
मटणामध्ये चांगले फॅटस्, फॅटी अॅसिड आणि मोनोसॅच्युरेटेड पॉलीफिनॉल्स असतात. जे बॉडी बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
दही तसेच डेअरी उत्पादनांचा जेवणात वापर अवश्य करा. यात प्रोटीन असते जे बॉडीसाठी फायदेशीर असते.