तुम्ही, झोपताना केस बांधून झोपता की मोकळे सोडून?

तुमचे केस लांबलचक असतील तर दिवसभर त्यांची निगा राखण्यात भरपूर वेळ तुम्ही घालवत असाल... पण, रात्री झोपताना काय करायचं हा मात्र प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल...

Updated: Jan 29, 2016, 03:23 PM IST
तुम्ही, झोपताना केस बांधून झोपता की मोकळे सोडून? title=

मुंबई : तुमचे केस लांबलचक असतील तर दिवसभर त्यांची निगा राखण्यात भरपूर वेळ तुम्ही घालवत असाल... पण, रात्री झोपताना काय करायचं हा मात्र प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल...

केस मोकळे सोडले तर केसांचा गुंता होणार... आणि तो सोडवताना केस तुटणार... आणि बांधून ठेवले तर केसगळती वाढणार... असा अनुभव तुम्हालाही आला असेल... पण, यावर उपाय म्हणजे तुमचे केस कसे आहेत यावर झोपताना ते कसे बांधावे हे अवलंबून आहे.

केस स्ट्रेट असतील तर... 

तुमचे केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनीटेल बांधून ठेऊ शकता. म्हणजे ते सकाळी फ्रिझी होत नाहीत. सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही.  तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील.

केस लांबलचक असतील तर... 

तुमचे केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. पण खूप वेळ आणि घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक आहे.

कुरळ्या केसांसाठी

तुमचे केस कुरळे असतील तर डोक्यावर त्याचा आंबाडा बांधा  किंवा एका बाजूला बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्या. पण तो खूप घट्ट बांधू नका.

केस ओले असतील तर.... 

केस ओले असताना ते मूळीच बांधून  ठेऊ नका. परंतू केसांमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी  तुम्हांला ते बांधून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर ते सुकल्यानंतरच बांधा. यामुळे ते तुटण्यापासून बचावतील.  हाच नियम ब्लो ड्रायसाठीदेखील लागू होतो. शक्य असेल तर नैसर्गिकरित्याच सुकवण्याचा प्रयत्न करा.