दाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी दूर करा

पुरुषांची एक समस्या असते ती म्हणजे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्याचे. त्यामुळे त्यांना अकाली वृद्धत्व आल्याची जाणीव होते. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा.

Updated: Jun 18, 2016, 11:03 PM IST
 दाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी दूर करा title=

मुंबई : पुरुषांची एक समस्या असते ती म्हणजे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्याचे. त्यामुळे त्यांना अकाली वृद्धत्व आल्याची जाणीव होते. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा.

१. डाळ आणि बटाटा यांची पेस्ट

हा उपाय आयुर्वेदात खूप महत्वाचा आहे. मिशीचे होणारे पांढऱ्या केसापासून सुटका होण्यासाठी बटाटे आणि डाळ यांचे मिश्रण करुन पेस्ट लावा. बटाट्यात ब्लिचिंगचे नैसर्गिक गुणधर्म असल्याकारणाने बटाटा दाडीमध्ये मिसळला तर मिशीच्या केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होतो.

२. तुरटी आणि गुलाबपाण्याची कमाल

तुरटी आणि गुलाब पाणी यांची पेस्ट तयार करुन ती मिशीला लावा. त्यामुळे मिशीचे केस नैसर्गिक रंग प्राप्त करील. तुरटी बारीक करुन त्याची पावडर गुलाब पाण्यात मिळसून लावणे फायद्याचे असते.

३. हळद

त्वच्या समस्येवर हळद एक रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये अॅंटीसेप्टिक आणि अॅंटीबायोटिक (बॅक्टीरिअल गुण) असते. त्यामुळे  केसांची वाढ रोखते. मिशीचे पांढरे केस कमी करण्यास मदत होते. दाट केसांसाठी याचा वापर करु शकता.

४. कच्चा पपई

कच्चा पपई त्वचा संदर्भातील समस्या दूर करण्यास मदत होते. नको असलेले केस हटविण्यासाठी मदत कच्च पपई करते. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर पपई यावर चांगला उपाय ठरु शकते. कच्चा पपईमध्ये फॉलिकल्स तोडण्यास मदत करते. त्वचा चांगली करण्यासाठी एक्सफोलिएट करते. तसेच मृत पेशींना हटविण्यास मदत करते.

५. गुलाबपाणी आणि मूग डाळ

गुलाबपाणी आणि मूग डाळ यांची पेस्ट करा. ती मिशी आणि दाढीला लावा. या पेस्टमुळे पांढरे केस हटण्यास मदत होते. मूगात एक्सफोलिएटिंग गुण असल्याकारणामुळे नको असलेले केस गळण्यास मदत होते. तसेच गुलाबपाणी त्वचा साफ करण्यास मदत करते शिवाय केस नष्ट करण्यास मदत होते. दोन्ही गोष्टी एकत्र केल्यामुळे याचा परिणाम पांढऱ्या केसांवर होते आणि ते नष्ट होतात. त्वचेला तजेदार बनवते.

६. पुदीनाची चहा

पुदीनाची चहा एक उत्तम उपाय आहे. जास्तीत जास्त पुदीनाची चहा घ्या. पुदीनामुळे मिशीच्या केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होतो. यामुळे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्यापासून सुटका होते आणि तुम्ही म्हातारे दिसणार नाहीत.