खजूर खाण्याचे हे फायदे आपल्याला आश्चर्यचकीत करतील

खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. चांगले फ्रुट आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो. 

Updated: Sep 4, 2015, 08:22 PM IST
खजूर खाण्याचे हे फायदे आपल्याला आश्चर्यचकीत करतील title=

मुंबई : खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. चांगले फ्रुट आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो. 

अधिक वाचा : आरोग्य विषयक बातम्या एका क्लिकवर

खरजूमध्ये ग्लुकोज आणि फळांमधील साखर याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आरोग्यवर्धक टॉनिक मिळण्यास मदत होते. मधुमेह (डायबेटीस) लोकांसाठी खजूर चांगले. खजूरमध्ये २३ कॅलरीज मिळतात. तसेच खजूरमध्ये कोलेस्ट्रोल नसतात. तसेच कर्करोग (कॅन्सर), हृदय रोगांसाठी खजूर एक वरदान आहे.

याचे काय  फायदे आहेत?
१. तात्काळ ताकद मिळते 
खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यवर्धक मात्रा असतात. ग्लुकोज, फळातील साखर प्रमाण असते. त्यामुळे खजूर खाण्यामुळे याचा शरीराला लाभ होतो. दोन ते चार खजूर खाल्ले तर आपल्याला एनर्जी मिळते.

२. वजन वाढविण्यास मदत 
आपले वजन वाढत नसेल. तुमची देहएष्टी किरकोळ असेल तर  वजन वाढविण्यासाठी खजूर मदत करतो. व्हिटॅमिन आणि प्रोटीन (प्रथिने) जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठी याची मदत होते. बारीक असणाऱ्या व्यक्तींनी रोज ४ ते ५ खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन वाढेल.

३. हाडे मजबूत होण्यास मदत
खजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

४. कपापासून मुक्तता
ज्यांना अपचचा त्रास आहे. तसेच कपचा त्रास असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळते. फायबर्सचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असते. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते. रात्री चार खजूर रात्री पाण्यात  भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर खा. आपल्याला काही दिवसात याचा फायदा लक्षात येईल.

५. त्वचा चमकते
खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.