हिवाळ्यात पेरू खाण्याचे खूप फायदे

थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्याच मदत करते. पेरू हृदयासंबंधी आजारांवर खूप उपयुक्त ठरतात. 

Updated: Jan 4, 2015, 04:29 PM IST
हिवाळ्यात पेरू खाण्याचे खूप फायदे title=

नवी दिल्ली: थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्याच मदत करते. पेरू हृदयासंबंधी आजारांवर खूप उपयुक्त ठरतात. 

हृदयासंबंधी आजारांमध्ये उपाय म्हणून पेरू महत्त्वपूर्ण ठरतात. जेवणासोबत पेरूची चटणी खाल्यानंतर आणि त्याचा मुरब्बा तीन महिने खाल्ला तर हृहयासंबंधी आजारांवर फायदा मिळतो. यानं रक्तासंबंध विकारही दूर होतात. 

जर आपल्या दातांमध्ये वेदना होत असेल तर पेरूच्या झाडाची पानं पाण्यात उकळून घ्या. नंतर पाणी गाळून थंड करा, त्यात तुरटी मिसळून गुरळा केल्यानं दात दुखणं कमी होतं. 

पेरू खाल्ल्यानं रक्तामध्ये साखरेचं प्रमाण कमी होतं. सोबतच पेरूचा अर्क रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्यानं पचनक्रीया व्यवस्थित होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.