पोटात गॅस झाल्यास ५ घरगुती उपाय

पोटात गॅस होणे ही समस्या अनेकांना असते. त्यावर काही घरगुती उपाय करून गॅसची समस्या तुम्ही घालवू शकता.

Updated: Mar 5, 2016, 10:09 PM IST
पोटात गॅस झाल्यास ५ घरगुती उपाय title=

मुंबई : पोटात गॅस होणे ही समस्या अनेकांना असते. त्यावर काही घरगुती उपाय करून गॅसची समस्या तुम्ही घालवू शकता.

१. चहा : तुम्ही चहा तर घेतच असाल. पण आता तुम्ही पेपरमिंटची चहा घेऊन पाहा. तुम्हाला गॅसच्या समस्यापासून आराम मिळू सकतो.

२. अद्रक : आहारामध्ये अद्रकचा वापर करा. अद्रकमध्ये काही रासायनिक द्रव्य असतात ज्यामुळे तुम्ही गॅसच्या समस्येपासून दूर राहू शकता.

३. जीरे : जीरं देखील गॅसच्या समस्येवर गुणकारी उपाय आहे. सकाळी थोडीशी जिरे पावडर काहीही खाण्यापूर्वी घ्या. तुम्हाला याचा फायदा होईल.

४. भोपळा : भोपळ्याची भाजी गॅसच्या समस्येला दूर ठेवते. जेव्हा जेवन पचन होत नाही तेव्हा गॅस होतो त्यामुळे भोपळा हा पचनसाठी फायदेशीर आहे. 

५. लिंबू पाणी : रोज सकाळी एक कप गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून तो प्यायल्याने गॅस पासून सुटका होते. काहीही खाण्यापूर्वी सकाळी लिंबूचा चहा जरी घेतला तरी आराम मिळतो.