www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
रात्री मध्येच जाग येते... पुरेशी झोप मिळत नाही... दिवसा एकाग्रतेत अडचणी येतात... एखादी गोष्ट लक्षात राहत नाही... अशा समस्यांना तुम्हीही सामोरं जात असाल तर एका नव्या संशोधनानं याचं उत्तर तुम्हाला दिलंय.
आपल्याला योग्य वेळेपुरती शांत झोप घ्यायला हवी, असं नेहमी सांगितलं जातं. एका संशोधनातून आता हेच म्हणणं अधोरेखित केलंय. एका नव्या संशोधनानुसार रात्री योग्य आणि पुरेशी झोप न मिळणं हे आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेकरता हानीकारक ठरू शकतं.
अनिद्रेनं पीडित लोक आणि रात्री भरपूर झोप घेणाऱ्या लोकांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत बरंच अंतर असल्याचं दिसून आलंय. बीबीसीच्या म्हणण्याप्रमाणे, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन डिएगोच्या संशोधनकर्त्यांच्या मते, स्मृती चाचणी दरम्यान कमी झोप मिळणाऱ्या लोकांना ध्यान केंद्रीत करण्यात अडचणी येतात. इतर तज्ज्ञांच्या मते, मेंदूच्या कार्यक्षमतेवर झोपेचा परिणाम दिसून येऊ शकतो.
‘स्लीप’ या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनावरून, अनिद्रेनं पीडित लोकांना रात्री झोप येत नाही तसंच उशीरा प्रतिक्रिया व्यक्त करणं, स्मृती कमी पडणं इत्यादी समस्यांना सामोरं जावं लागतं.
संशोधनात २५ अनिद्रा समस्येनं पीडित लोकांची तुलना योग्य झोप घेणाऱ्या लोकांसोबत केलीय. स्मृती चाचणी दरम्यान त्यांच्या मेंदूनची एमआरआय स्कॅनिंगदेखील केलं गेलं. यानंतर तज्ज्ञांनी हा निष्कर्ष काढलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘अनिद्रेनं पीडित लोकांना फक्त झोपेचीच समस्या सतावत नाही तर दिवसाही त्यांचा मेंदू चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकतं नाही’.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.