मुंबई : झिरो फिगरची स्पर्धा सध्या मुलींमध्ये चांगलीच रंगली आहे. त्यासाठी मग मुली काहीही करायला तयार होतात. बऱ्यास मुली त्यासाठी डायटींगचा पर्याय निवडतात. पण असं करणं हे मुलींसाठी धोकादायक ठरू शकतं.
डायटींग जर चुकीच्या पद्धतीने केली गेली तर त्यामुळे एनोरेक्सिया नर्वोसा सारखे गभींर आजार मुलींना होऊ शकतात. शरीर बारीक होण्यासाठी काही मुली ह्या नुसत्या फळांच्या ज्यूसवर दिवसभर राहतात. ज्यामुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होऊन वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते.
काहीच न खाल्याने वजन कमी होतं हा समझ चुकीचा आहे. उलट यामुळे अशक्तपणा येतो आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते. मानसिक आजार होण्याचीही शक्यता असते. सध्याच्या मुलींमध्ये यामुळेच एनोरेक्सिया या आजाराचं प्रमाण वाढत आहे.
एनोरेक्सिया या आजाराचे परिणाम : किडणीचे विकार, कर्करोग, गर्भाशयाचे आजार, हिमोग्लोबीनच्या प्रमाणात घट, अनियमित मासिक पाळी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.