डायबेटीसच्या व्यक्तींचा असा असावा आहार

डायबेटीसच्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे.

Updated: Jun 26, 2016, 06:57 PM IST
डायबेटीसच्या व्यक्तींचा असा असावा आहार title=

मुंबई : डायबेटीसच्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. दूध, दही, पनीर, अंड, मासे, सोयाबीन यांचं सेवन केलं पाहिजे. इन्सुलीन घेत असलेल्या व्यक्तींनी वेळेवर आहार घेतला पाहिजे. असं न केल्यास हायपोग्लाइसीमिया होऊ शकतो.

अशक्तपणा येणे, खूप भूख लागणे, घाम येणे, अस्पष्ट दिसणं किंवा अंधारी येणे. हृदय जोरजोरात धडकणे ही त्याची काही लक्षणं आहेत. 

१. डायबेटीसच्या व्यक्तींनी नेहमी गोड वस्तू म्हणजेच ग्लूकोज, शकर, चॉकलेट, गोड बिस्किटं जवळ ठेवली पाहिजेत. वरील काही लक्षण दिसल्यास लगेचच त्याचं सेवन केलं पाहिजे. सामान्य डायबेटीसच्या व्यक्तीने त्यांच्या आहारावर खूप लक्ष दिलं पाहिजे. थोड्या-थोड्या वेळात काहीतरी खाल्लं पाहिजे. 

२. तळलेले पदार्थ, मिठाई, बेकरीतील पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. कमी कॅलरीयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. भाजलेले चणे, सूप, मोड आलेली कडधान्य, सलाड यांचं सेवन केलं पाहिजे. 

३. दही, ताकचं सेवन अशा व्यक्तींसाठी चांगलं आहे. मेथेच्या दाण्याचे पूड तयार करुन अर्धा किंवा एक चमच खाल्याने १२ ते २० मिनिटात शूगर कंट्रोल होते. गहूच्या पीठात सोयाबीनचे पीठ एकत्र करुन सेवन करावे.

४. तूप आणि तेलाचे सेवन दिवसभरातून २० ग्रॅमहून अधिक (4 चमचे) जास्त नसलं पाहिजे. सगळ्या भाज्या कमीत कमी तेलामध्ये शिजवल्या पाहिेजे. नॉनस्टिक कुकवेयरमध्ये भाज्या शिजवल्या पाहिजे. जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचं सेवन केलं पाहिजे.