रोज तासभर टीव्ही पाहिल्यानं होतो डायबिटीज?

रोज एक तास टीव्ही पाहिल्यानं डायबिटीजची शक्यता ३ टक्क्यांनी वाढते, असा निष्कर्ष एका नवीन संशोधनात काढण्यात आला आहे. संशोधकांनी डायबिटीज प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत २००२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातील माहितीचा आधार यात घेतला आहे. 

Updated: Apr 7, 2015, 12:32 PM IST
रोज तासभर टीव्ही पाहिल्यानं होतो डायबिटीज? title=

मुंबई: रोज एक तास टीव्ही पाहिल्यानं डायबिटीजची शक्यता ३ टक्क्यांनी वाढते, असा निष्कर्ष एका नवीन संशोधनात काढण्यात आला आहे. संशोधकांनी डायबिटीज प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत २००२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातील माहितीचा आधार यात घेतला आहे. 

या अभ्यासानुसार ३२३४ जास्त वजनाच्या अमेरिकी प्रौढांचा यात समावेश करण्यात आला होता आणि ते पंचविशीच्या वयोगटातील होते. त्यांच्यात टाइप २ प्रकारचा डायबिटीज कमी करण्यासाठी जीवनशैलीचे प्रयोग तसंच मेटफॉरमिन याचा वापर केला जात होता. 

'डायबेटोलिगिया' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार डायबिटीजवर माणसाच्या जीवनशैलीचे परिणाम तपासण्यात आले. त्यात सहभागी व्यक्तींना एक तास टीव्ही पाहण्यानं डायबिटीज होण्याचा धोका ३.४ टक्के वाढल्याचं दिसून आलं. त्यात वय, लिंग, उपचार आणि शारीरिक व्यायामाचा कालावधी या गोष्टींचं समायोजन करण्यात आलं होतं. या संशोधनानुसार जास्त काळ टीव्ही पाहिल्यानं निष्क्रियता वाढून वजन २.१ टक्के वाढतं त्यामुळं विकसित देशात डायबिटीजचा संबंध हा टीव्ही पाहण्याशी आहे. 

शरीराचं वजन वाढल्यानं बसण्याच्या पद्धतीही बदलून जातात. पीटसबर्ग विद्यापीठाच्या डॉ. आँद्रिया क्रिस्का यांनी म्हटलं आहे, की हे संशोधन महत्त्वाचं आहे कारण एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहण्यानं हा धोका असतो. त्यामुळं जीवनशैलीत जर आपण एकाच ठिकाणी बसण्याचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा उपयोग होतो. माणसात जास्त क्रियाशीलता असेल, तर त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. त्यामुळं एकाजागी जास्त काळ बसण्याचं टाळावं. 

- भारतात ४० कोटी लोकांना डायबिटीज असल्याचा अंदाज. 
- ३० कोटींना डायबिटीज झाल्याचे पक्के निदान. 
- २ कोटी मुलांना डायबिटीज 
- चरबीयुक्त अन्नपदार्थाचे सेवन आणि 'व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.